मुरंबी फार्मस्

एक आपलं असं फार्म हाऊस असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यात फळफुल धान्य पिकावित, सोबत चार गायीगुरं असावित, काही पाळीव पशुपक्षी असावेत, फार्म हाऊस नदीच्या किंवा डोहाच्या काठावर असावं, सुर्योदय सुर्यास्त ऊन वारा पाऊस याचा भरपूर आनंद लुटता यावा, जमीन डोंगराळ खडकाळ असावी, नागमोडी पाऊलवाटा असाव्यात आणि आपल्या आवडत्या देवाचं त्यात मंदिर असावं ….. असं एक निश्चित टुमदार फार्महाऊसच प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझंही होतंच आणि अगदी तसंच आहे ‘मुरंबीफार्मस्’.

मुंबईकडुन नाशिकला जाताना नाशिक शहर अजुन १८ कि.मी. वर असतांना वाडिवऱ्हे नावाचं गाव लागतं. या गावातुन सांजेगाव त्र्यंबकेश्वरला रस्ता जातो. हायवे पासुन केवळ 5 कि.मी. अंतरावर मुरंबी गांव आहे. या गावात भैरवनाथ मंदिरापासुन मुकणे धरणाकडे जाणारा गावरस्ता आहे. या रस्त्याच्या अगदी शेवटी मुरंबी फार्मस् आहे. रस्त्याच्या शेवटी असल्याने फार्मच्या तीनही बाजुस मुकणे धरणाचे नयनरम्य पॅनॉरॉमिक नजाऱ्याने अथांग पाणी दिसते. एका बेटावर आल्याचा भास होतो.

मुरंबी फार्म मुद्दामच Rustic बनवलंय कमीतकमी बांधकाम,मुळ झाडांना शक्यतो तसंच ठेवलंय, झाडं तशीच रहावीत म्हणून बांधकामाच्या जागेत बदल केलाय. बेडरुमस् सोडुन सर्व जागा भिंती विरहित ठेवल्या आहेत. चढ उताराच्या जागा तशाच ठेऊन उपलब्ध दगडांच्या छोट्या पाऊलवाटा तयार केल्या. जागा उताराची, खडकाची आणि जमिनीत मुरुम जास्त म्हणुन सपाटीकरण वगैरे न करता शक्य तेवढी फळझाडं लावली, हळुहळु आता झाडांच्या सावल्या गडद होत चालल्या आहेत.

सुरवातीला हे सगळं स्वत:साठी व आप्तेष्ट मित्र मंडळींसाठीच करायचं ठरवलं होतं, मात्र नंतर देखभाल खर्च वाढत चालल्याच लक्षात आलं. त्याच वेळेला इगतपुरी तालुक्यात Vista Rooms (Stay Vista) या कंपनीच्या प्रतिनिधी श्रीमती चंचल शर्मा यांनी फार्मला भेट दिली. आणि लोकेशन बघुन फार्मच्या प्रेमातच पडल्या आणि फार्महाऊसची चांगली देखभाल ठेवायची असेल तर hosting करा म्हणून आग्रह धरला. काही काळ गेल्यानंतर त्यांचा सल्ला पटायला लागला. मग फार्महाऊस MTDC च्या Bed and Breakfast Scheme मध्ये register करुन घेतलं. वाडिव्हरे गावातील शिंदे कुटुंबाने गरमागरम चविष्ट जेवण जागेवरच बनवून देण्याची तयारी दर्शविली. मग एक छोटेखानी Rustic असा open Cafe उभारला आणि होस्टिंग सुरु केलं.

चार डिलक्स रुमस् असल्याने चार कुटुंब मनसोक्त मजा करु शकतात. आलेल्या गेस्टला दोनतीन दिवस सुट्टीचा आणि आरामाचा भरपुर मजा घेता यावा म्हणुन swimming pool बांधला Football किंवा Cricket खेळण्यासाठी Turf box केला, बोर्ड गेम्स ठेवले. फार्मला सहज फेर फटका मारण्यासाठी दगडी नागमोडी peripheral walkway तयार केला.ही पाऊलवाट अगदी धरणाच्या कडेला घेऊन जाते. तिथे निवांत बसण्यासाठी छानशी सावली केली आहे. जवळंच असलेल्या विहिरीला आच्छादन टाकुन तिथेच दगडांचा ॲम्फीथिएटर बनवला आहे. इथे सगळेच रममाण होतात. रात्री चंद्रचांदण्यांची ग्रहताऱ्यांची मजा घेण्यासाठी तीन हजार स्के. फुटाची मोठ्या जहाजावरील डेक सारखी भव्य टेरेस आहे. इथे गप्पागोष्टी गाणी धमाल मस्ती करतांना रात्र कधी निघुन जाते कळतंही नाही. या ठिकाणी Camping tents मध्ये राहण्याची मजा काही औरच असते. प्रसन्न असं श्री गजानन महाराज, शेगांव यांचे देऊळ आहे. फार्मची स्वच्छता, रुम्सची स्वच्छता, जेवणाचा दर्जा आणि रुमसर्व्हिस या अत्यंत नेटकेपणे ठेवल्या आहेत. Stay Vista चा टायअप Club Mahindra शी असल्याने club Mahindra चे गेस्टही येतात. गेल्या वर्षभरात गेस्टनी जेवण, स्वच्छता आणि सेवा याबाबत rating एकदम high दिले याचा आनंद आहे. इथे आजुबाजुच्या गावातील आदिवासी कुटुंबियांना रोजगार दिलेला आहे. हळुहळु सगळे well trained झाले आहेत. सगळयांनाच स्वच्छतेच महत्वही कळलयं. गेस्टसाठी रात्रीअपरात्री निस्वार्थपणे सेवेसाठी स्टाफ हजर असतो.

मुरंबी हे इथल्या गावाचं नाव आहे . मुरंबीमधील हा होस्टींगचा तसा पहिलाच project. याला गावाचं नाव दिल्यावर गावं सर्वदुर प्रसिध्द होईल म्हणून फार्मला ‘मुरंबी फार्मस्’ म्हणूनच नाव दिलंय. इथे शेती करताना कटाक्षाने organic शेती केली जाते. गीर गायींचा गोठा आहे. गायींचे शेण आणि गोमुत्रातुन जीवामृत बनवून शेतीतील झाडांना सातत्याने देण्यात येते. गावठी कोंबड्यांची छोटीशी पोल्ट्री, ससे, बदकं यामुळे वातावरण आनंदीत रहाते. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला आहे. फळझाडांची ड्रीप इरिगेशन सिस्टीम सौर ऊर्जेवर आहे. तर गेस्टच्या गरम पाण्यासाठी सोलर हिटर आहेत. तसंच फार्मला लागणारी विज लक्षात घेऊन Solar PV project बसवुन विजेचे उत्पादन करण्यात येऊन ते वीज वितरण कंपनी MSEDCL ला Grid वर देण्यात येते. आज फार्मवर वीज वापरापेक्षा वीज निर्मिती जास्त होत असल्याने Craban cradit point जास्त मिळत असल्याचा अभिमान आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अहमदाबाद, सुरत इथल्या पर्यटकांची इगतपुरीकडे पसंती सतत वाढत चाललीय. इगतपुरी तालुका हा पर्यटकांसाठी adventure,peace & purpose, mountain ranges इत्यादी विविध कारणानी आकर्षित होत असल्याचे Internet वर आढळुन येत आहे. धरणाच्या काठावर तीनही बाजू नयनरम्य पाण्याने वेढलेले अत्यंत organic असलेले आणि Carban credit earn करुन देणारे मुरंबी फार्मस् जरुर अनुभवा असा आग्रह आहे.

For Booking please contact – Dr. Dhanashri Hardas 9869031922